‘पहले आप जनाब’ या आगामी चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनबरोबर काम करायची संधी मिळल्याने चित्रांगदा सिंग अतिशय खूश आहे. चित्रपटसृष्टीतील या महानायकाबरोबर काम करण्याची संधी मिळणे, म्हणजे आपल्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखे असल्याचे ती म्हणाली.
वृत्तसंस्थेशी संवाद साधताना चित्रांगदा म्हणाली, अमिताभ हे कालातीत आहेत. लहानपणापासून मी त्यांची चाहती आहे. मी खूप खूश असून, त्यांच्याबरोबरच्या ‘पहले आप जनाब’ या चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्याची मी वाट पाहात आहे. जानेवारी महिन्यात आम्ही चित्रीकरणास सुरूवात करू.
सुधीर मिश्रा यांच्या ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या चित्रांगदाने, नंतर मिश्रा यांच्या ‘ये साली जिंदगी’ आणि ‘इन्कार’ या चित्रपटात देखील काम केले. आता त्यांच्याच ‘पहले आप जनाब’ या चित्रपटात ती अमिताभ बच्चनबरोबर दिसणार आहे.
व्यावसायीक आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना सहन कराव्या लागणाऱ्या लैंगिक छळवणूकीवर चित्रांगदाचा ‘इन्कार’ हा चित्रपट आधारीत होता. याचाच धागा पकडून सध्या गाजत असलेल्या तरुण तेजपाल प्रकरणाबाबत विचारले असता ती म्हणाली, तरुण तेजपाल प्रकरणात नक्की काय झाले ते मला माहित नाही. मला इतकेच म्हणायचे आहे की, ज्या ठिकाणी पुरुष प्रभावशाली असतात, त्या ठीकाणी नेहमीच लैंगिक अत्याचारासारखी प्रकरणे आढळून येतात.
आवाज संस्थेतर्फे मुंबईत आयोजीत करण्यात आलेल्या ‘इंडियन ब्रायडल फॅशन वीक’मध्ये चित्रांगदाने ‘रॅम्प वॉक’ केले. प्रख्यात फॅशन डिझायनर तरुण तहिलियानी यांनी अधुनिक वधुसाठी तयार केलेला लाल रंगाचा ‘ब्रायडल ड्रेस’ परिधान केलेल्या चित्रांगदाने रॅम्पवर आपली जादू पसरवली. या ‘ब्रायडल शो’च्यावेळी तिला ज्योती रन्धवा या भारतीय गोल्फरबरोबर झालेल्या तिच्या लग्नाची आठवण झाली. ती म्हणाली, मला माझ्या लगनाचे दिवस आठवले. संपूर्ण दिवसभर मला हुरहुर लागून राहिली होती, पण ते फार लवकर संपूष्टात आले. परंतु, आज मला खूप वेगळे वाटत आहे. कारण अधुनिक वधुसाठी खास तयार करण्यात आलेला ड्रेस मी परिधान केला आहे. आपला मित्र तरुण याने आपल्या या लूकवर काम केल्याचे ती म्हणाली.
अमिताभ हे कालातीत : चित्रांगदा सिंग
'पहले आप जनाब' या आगामी चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनबरोबर काम करायची संधी मिळल्याने चित्रांगदा सिंग अतिशय खूश आहे. चित्रपटसृष्टीतील या महानायकाबरोबर काम करण्याची संधी मिळणे...
First published on: 02-12-2013 at 07:33 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan is timeless chitrangda singh