‘कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो आहे. या शोमध्ये स्पर्धक बिग बींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकतात. अनेक स्पर्धक आपल्या ज्ञानाचा वापर करून २५ लाख, ५० लाखांपर्यंत रक्कम जिंकतात. काही स्पर्धक तर १ कोटी रुपये जिंकण्यातही यशस्वी ठरतात. यंदा व्या सीझनमध्ये अनेक स्पर्धकांनी लाखो रुपये जिंकले. सध्या नुकतेच ५० लाख रुपये जिंकणाऱ्या एक स्पर्धकाची सोशल मीडियावर चर्चा आहे. शोमध्ये येण्यापूर्वी त्याच्याकडे कपडे घेण्याचेही पैसे नव्हते, परंतु आपल्या हुशारीच्या जोरावर तो लखपती बनला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ऋषी राजपूत यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर आपली कहाणी सांगितली. तो म्हणाला, ‘मी गरीब कुटुंबातील आहे आणि वेल्डिंगचे काम करतो. शोमध्ये येण्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे मी काही पैसे उसने घेऊन दुकानातून कपडे घेतले.’ ऋषी राजपूतबद्दल ऐकून अमिताभ बच्चन यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Bigg Bossचे घर कुठे आहे? त्याची किंमत किती आणि मालकी कुणाची? जाणून घ्या


ऋषी राजपूतने शोमध्ये असेही सांगितले की, त्याने १५० रुपये मजुरीवर काम सुरू केलं, पण केबीसीच्या माध्यमातून एका दिवसांत लाखो रुपये कमवू शकेल, असं त्याला वाटलं नव्हतं. अमिताभ बच्चन यांनी ऋषी राजपूतला प्रोत्साहन दिलं आणि खेळासाठी शुभेच्छा दिल्या. तिन्ही लाइफलाइन्सचा योग्य वापर करून ऋषीने ५० लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. ऋषी राजपूतच्या खेळाने अमिताभ बच्चनही प्रभावित झाले होते. मात्र, ऋषीने ७५ लाख रुपयांच्या प्रश्नावर थांबण्याचा निर्णय घेतला. खरं तर अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहीत होते. पण लाईफलाईन नसल्याने त्याला रिस्क घ्यायची नव्हती आणि त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

फक्त ५० रुपयांसाठी अनिल अंबानींच्या लग्नात जेवण वाढायला गेली होती ‘ही’ अभिनेत्री; आता आहे कोट्यवधींची मालकीण

१९४७ साली कोरियाच्या महाराजांनी भारतात कोणत्या प्राण्याच्या प्रजातीच्या शेवटच्या जीवंत सदस्यांना गोळ्या घातल्याचं मानलं जातं?

अ) निलगिरी तहरी
ब) एशियाटिक चित्ता
क) सुमात्रन गेंडा
ड) गुलाबी डोक्याचे बदक

या प्रश्नावर ऋषीने आधी आपल्याला ‘ब’ हे उत्तर योग्य वाटत असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र कोणतीही लाइफलाइन नसताना अंदाजावर उत्तर देण्याचा धोका फार असल्याचंही तो म्हणाला. उत्तर चुकलं तर मी थेट ३ लाख २० हजारांवर येईल. त्यामुळेच मी खेळ सोडू इच्छितो असं ऋषीने अमिताभ यांना सांगितलं. अमिताभ यांनीही ऋषीला खेळ सोडण्यास परवानगी दिली.

rishiii
अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला विचारलेला प्रश्न…

५० लाख रुपये ऋषीच्या खात्यावर पाठवल्यानंतर अमिताभ यांनी त्याला एक उत्तर द्यायचं झालं तर काय देशील असं विचारलं असता त्याने ‘ब’ हाच पर्याय निवडला. अमिताभ यांनी हे उत्तर लॉक केलं आणि आश्चर्य म्हणजे हे बरोबर आलं. मात्र त्यापूर्वीच ऋषीने खेळ सोडल्याचं जाहीर केल्याने त्याला पुढे खेळता आलं नाही. आपलं उत्तर बरोबर असल्याचं पाहिल्यानंतर ऋषी ज्या बिनधास्तपणे खेळला त्याचप्रमाणे त्याने, “७५ लाख जिंकलो असतो तर सात कोटी नक्कीच जिंकलो असतो,” अशी प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया ऐकून अमिताभ यांनाही हसू आलं.


ऋषीजवळ लाइफलाइन नसल्यामुळे त्यांनी रिस्क न घेता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, खेळ सोडल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ऋषी राजपूत यांना एक पर्याय निवडण्यास सांगितले तेव्हा त्यांनी योग्य उत्तर दिले. यामुळे ऋषी राजपूत आणि अमिताभ आणखी आश्चर्यचकित झाले. त्यांनी खेळ सोडण्याऐवजी पुढे खेळला असता तर ७५ लाख जिंकून एक कोटींचा प्रश्न गाठला असता, पण त्यात धोका होता. कारण त्याचे उत्तर चुकले असते तर तो थेट २५ लाखांवर येऊन पोहोचला असता. त्यामुळे त्याने ५० लाख रुपये जिंकत खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader