बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांचे जगभरात चाहते आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले आहे. मात्र त्यांच्या ट्वीटमुळे चाहते काळजीत पडले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी रविवारी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, “हृदयाचे ठोके वाढले आहेत.. चिंता वाटत आहे.. पण मला आशा आहे की सर्व काही ठीक असेल.” त्यासोबतच बिग बींनी हृदयाचा आणि हात जोडलेला एक इमोजीही शेअर केला आहे. सध्या बिग बींचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे.

अमिताभ यांच्या या ट्वीटनंतर ते आजारी पडले आहेत, असा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात आहे. बिग बींच्या या ट्वीटखाली अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘लवकर बरे व्हा’, ‘काळजी घ्या’, ‘सुरक्षित राहा’, अशा अनेक कमेंट बिग बींच्या पोस्टखाली दिसत आहे.

चित्रपटाच्या शूटींगदरम्यान प्रियांका चोप्राने चोरला होता अभिषेक बच्चनचा फोन अन्…

अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. बिग बी हे काही दिवसांपूर्वी ‘चेहरे’ या चित्रपटात झळकले होते. त्यासोबतच बिग बींची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय ते लवकरच ‘ब्रह्मास्त्र’, ‘द इंटर्न’, ‘रनवे 34’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

Story img Loader