प्रसिद्ध बॉलिवूडपट ‘शोले’मध्ये गब्बर नावाचा दरोडेखोर साकारून मोठ्या पडद्यावर खलनायकाचा दरारा निर्माण करणारे अमजद खान यांचा मुलगा शादाब अमजद खानच्या ‘मर्डर इन बॉलिवूड’ पुस्तकाचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन झाले. शादाबला लेखकाच्या भूमिकेत पाहून आश्चर्यचकीत झालेल्या बच्चन यांनी अमजद खान आणि त्यांच्यातील मैत्रीपूर्ण आठवणींना यावेळी उजाळा दिला. अमजद खान एक चांगले सहकलाकार होते. अनेक चित्रपटांमधून एकत्र काम केलेल्या आमच्या दोघांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध होते. अमजद खानबरोबरच्या खास मैत्रीमुळेच आपण आज या कार्यक्रमास उपस्थित असल्याचे अमिताभ बच्चन म्हणाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती लावून आपल्याला आनंद झाल्याचे सांगत, शादाबचे पुस्तक वाचण्यासाठी उत्सुकता प्रकट केली. पुस्तक लिहिण्यातून वेळ काढून अभिनयाचा वारसा जपण्याचा सल्ला त्यांनी शादाबला दिला. अमजद खान आणि अमजद यांचे वडील जयंत दोघांनी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे अमिताभ बच्चन यांनी मोठ्या मनाने मान्य केल्याचे सांगत शादाबने त्यांचे आभार मानते. फार थोड्या लोकांकडे जुन्या जमान्यातील शिष्टाचार, जिव्हाळा आणि आदरातिथ्य आढळून येते आणि अमिताभ बच्चन हे यापैकी एक असल्याची भावना त्याने यावेळी व्यक्त केली

Story img Loader