बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अमिताभ यांची संपत्ती किती आहे हे जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना नेहमीच लागून असते. खरंतर अमिताभ यांनी संपत्ती ही कोट्यावधींमध्ये आहे. सर्वसामान्य जनतेप्रमाणे अमिताभही त्यांच्या काही जागा या भाडेतत्वावर देतात. अमिताभ यांनी त्यातील एक जागा ही स्टेट बँक ऑफ इंडियाला १५ वर्षांसाठी भाडेतत्वावर दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, अमिताभ यांनी जलसा या त्यांच्या घराजवळील एक जागा पुन्हा एकदा भाडेतत्वावर दिली आहे. ही जागा अमिताभ यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला १५ वर्षांसाठी भाडेतत्वावर दिली आहे. यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडिया अमिताभ यांनी भलीमोठी किंमत देते.
आणखी वाचा : ‘कुंद्राला भेट…’, ब्रालेटमध्ये विमानतळावर पोहोचल्यामुळे उर्फी जावेद पुन्हा एकदा ट्रोल
जुहू परिसरातील अमिताभ यांच्या अम्मू आणि वत्स या बंगल्याचा तळमजला हा स्टेट बँक ऑफ इंडियाने भाड्याने घेतला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनसोबत हा भाडेतत्त्वाचा करार केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, यासाठी एसबीआय बच्चन यांना दरमहा १८.९ लाख रुपयांचे भाडे देणार आहे. याशिवाय भाड्यामध्ये दर पाच वर्षांनी २५ टक्के वाढ केली जाणार आहे. तर त्यानंतर पुढचे पाच वर्ष हे भाडं २३.६२ लाख रुपये होईल आणि शेवटच्या पाच वर्षात २९.५३ टक्के भाडे एसबीआय अमिताभ यांना देणार आहेत. पहिल्या वर्षाच भाडं बँकेने आगाऊ दिलं आहे. दरम्यान, अमिताभ किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाने या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आणखी वाचा : Bigg Boss 15: ‘ही’ महिला स्पर्धक अंघोळ करत असताना प्रतीकने तोडला दरवाजा अन्…
अमिताभ यांचा हा बंगला जुहूमधील त्यांच्या जलसा या बंगल्याच्या जवळचा आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने भाडेतत्वावर घेतलेल्या बंगल्याची जागा ही ३ हजार १५० चौ. फूट आहे. दरम्यान, अमिताभ यांचे जुहूमध्येच जलसा या बंगल्या व्यतिरिक्त प्रतिक्षा, जनक, अम्मू आणि वत्स हे बंगले आहेत.