टीव्हीवरील लोकप्रिय क्विझ शो कौन बनेगा करोडपतीचे १४वे पर्व सध्या सुरू आहे. हा शो दिवसेंदिवस मजेदार होत आहे. शोमध्ये नवनवीन स्पर्धक येतात आणि सेटवर रंजक किस्से घडत असतात. काही स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत असतात, तर काही स्पर्धक सेटवर त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे चर्चेत येतात. सध्या केबीसीमधील एका महिला स्पर्धकाची चर्चा होत आहे. कारण या स्पर्धकामुळे बिग बी त्यांची खुर्ची सोडून जायला निघाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुस्लीम आई, दोन लग्न, परवीन बाबीशी अफेअर अन् स्वतःच्याच मुलीबरोबर…; महेश भट्ट यांच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्से


मागच्या एपिसोडमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टला उत्तर देत स्पर्धक बिजल हर्ष सुखानी हॉटसीटवर पोहोचली. ती पेशाने मानसशास्त्रज्ञ आहे. तसेच ती एक क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आणि मुलांसाठी बिहेवियर थेरपिस्ट देखील आहे. नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन यांनी बिजलला खेळ सुरू होण्यापूर्वी खेळाचे नियम समजावून सांगितले. त्यानंतर खेळ सुरू झाला आणि बिग बींनी तिला प्रश्न विचारला, पण स्पर्धकाचं लक्ष कम्प्युटरच्या स्क्रीनकडे अजिबात नसतं. त्यामुळे अमिताभ बच्चन तिला स्क्रीनवर न बघते दुसरीकडे का बघत आहेस, असं विचारतात. त्यावर मला तुमची भीती वाटते, असं बिजल अमिताभ यांना म्हणाली.


हे ऐकून बिग बी खुर्ची सोडून उभे राहतात आणि बिजलच्या पतीला फोन करतात. त्यांना म्हणतात की ‘या, तुम्ही इथे बसा.’ यानंतर बिग बी प्रेक्षकांजवळ जाऊन उभे राहतात आणि म्हणतात की ‘मी असं खेळू शकत नाही.’ तेव्हा बिजल म्हणते की ‘तुम्ही प्रश्न विचारल्यावर तुमची भीती वाटते.’ त्यावर बिग बी म्हणतात, ‘मी प्रश्न विचारले नाहीत तर आपण हा खेळ कसा खेळणार?’ या सर्व गोंधळात खूप प्रयत्नानंतर खेळ सुरू होतो आणि बिग बी बिजलला प्रश्न विचारतात. पण एक लाख २० हजार रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला बिजलने चुकीचं उत्तर दिलं, त्यामुळे तिला फक्त १० हजार रुपये घेऊन घरी परतावं लागलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan leaves chair after contestant bijal sukhani says she is scared of him hrc