अमिताभ यांचा भारदस्त आवाज हा बॉलीवूडच्या इतिहासातील लक्षणीय भाग आहे. हाच आवाज आता आपल्याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी सांगताना ऐकू येणार आहे.
रुपेरी पडद्यावर ‘अँन्ग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ ५० वर्षे जुन्या अॅण्टी करप्शन एजन्सीच्या लघुपटासाठी आवाज देणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने तयार करण्यात येणा-या इंग्रजी लघुपटाला कबीर बेदी आवाज देणार असून, हिंदी आवृत्तीसाठी बॉलीवूड शहेनशहा आवाज देणार आहेत. त्यांनी शनिवारी लघुपटाचा काही भाग डबिंग केला. विभागाच्या व्यावसायिक आणि तांत्रिक तेजाने आपण थक्क झालो आहोत, असे अमिताभ यांनी ट्विट केले आहे.
या लघुपटाद्वारे केंद्रीय अन्वेषण विभागाचे अज्ञात पैलू पाहावयास मिळणार आहेत. तसेच, केंद्रीय पोलिसांद्वारे कामात दाखवलेली मानवी बाजूदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. सदर लघुपटाद्वारे चिकाटी, शौर्याच्या थरारक कथांचे विवरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा