बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या आर बल्की यांच्या ‘शमिताभ’ चित्रपटाचे मढ आइसलॅण्ड येथे चित्रीकरण करत आहेत. याच ठिकाणी भाऊ अजिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबासमवेतच्या घालवलेल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे.
अमिताभ आणि अजिताब यांचे कुटुंब एकत्र येऊन मढ आइसलॅण्ड येथे विकएन्डची मजा घेत असत, असे अमिताभ यांनी त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर म्हटल आहे. आर बल्कीच्या शमिताभ या चित्रपटासाठी मढ आइसलॅण्ड येथे शूटींग…. एकेवेळेचा पिकनिक स्पॉट, पण आता गर्दीने भरलेल्या शहराची सवय झाली आहे…. आम्ही येथे सुट्टी घालविण्यासाठी यायचो.. समुद्राजवळच एक छोटेसे कॉटेज होते… इथे माझे आणि माझ्या भावाचे संपूर्ण कुटुंब येऊन राहायचो. आठवड्याच्या सुट्टीसाठी यायचो आणि तीन महिने राहायचो… खूप मजा यायची, असे बीग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. मात्र, आपण ही जागा सोडल्याचे त्यांना दुःख अल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan misses time spent with brother ajitabh