हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन आता छोट्या पडद्यावर एका काल्पनिक पटकथेवर आधारित मालिकेत (‘फिक्शन शो’) अभिनय करणार आहे. छोट्या पडद्यावर अभिनय करण्यासाठी अमिताभ खूप उत्सूक असून उत्साहीदेखील आहे.
१५ वर्षांपूर्वी अमिताभने टीव्हीवरील प्रसिद्ध गेम शो ‘कौन बनेगा करोड़पती’ द्वारे टीव्हीच्या दुनियेत पाऊल टाकले होते. परंतु, आता प्रथमच छोट्या पडद्यावर तो आपल्या अभिनयाची चुणूक दखवणार आहे. अमिताभ म्हाणाला, मी टीव्हीवर काही वेगळे करू इच्छितो. मला ‘काल्पनिक पटकथेवर आधारित मालिकेत’ (‘फिक्शन शो’) काम करायचे असून, आताच या मालिकेच्या कथेबाबत सांगणे घाई केल्यासारखे होईल.प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप या मालिकेचे कला दिग्दर्शक असणार आहेत.
जिया खान विषयी बोलताना अमिताभ म्हणाला की, जिया खानच्या आत्महत्येच्या वृत्ताने  मी खूप दुःखी झालो असून, मला खूप मोठा धक्का बसला आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की आतताईपणे अशाप्रकारची कृती करू नका. जगात अशी अनेक लोक आहेत, जे स्वप्न साकार न झाल्याने दुःखांचे, विवंचनेचे आणि निराशेचे जीवन जगत असून, मी त्यांना जीवनात हार न मानण्याचे आवाहन करत आहे. जियाने अमिताभबरोबर ‘नि:शब्द’ चित्रपटात काम करून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Story img Loader