बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी त्यांनी शेअर केलेला एक जुना फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमिताभ यांनी हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. अमिताभ यांनी शेअर केलेल्या या फोटोत एक लहाण मुलगी दिसत आहे. ही लहानमुलगी दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची बेबो करीना कपूर आहे.

जेव्हा अमिताभ रणधीर कपूर यांच्यासोबत पुकार या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते तेव्हाचा हा फोटो आहे. हा फोटो शेअर करत अमिताभ म्हणाले, “ओळखा पाहू कोण आहे? गोव्यात सुरु असलेल्या पुकार चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी करीना सेटवर रणधीर कपूर यांच्यासोबत आली होती. तिच्या पायाला जखम झाली होती आणि मी तिचे पाय धुवून औषध लावले.”

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

या विषयी अमिताभ यांनी २०१३ मध्ये त्यांच्या ब्लॉगमध्ये ही सांगितले होते. “१९८३ मध्ये पुकार चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं. तेव्हा शूटिंग सुरु असताना अमिताभ यांनी रणधीर कपूर यांना मारहाण केली. तेव्हा करीना नाराज झाली. रणधीर यांना वाचवण्यासाठी करीनाने अमिताभ यांचे पाय घट्ट धरले. ती खूप अस्वस्थ झाली होती. तिचे लक्ष दुसरीकडे येण्यासाठी मी पाणी मागवले आणि तिचे छोटे पाय धुतले”, असे अमिताभ त्या ब्लॉगमध्ये म्हणाले होते.

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

पुढे अमिताभ म्हणाले होते, “मला वाटतं पाय धुतल्यानंतर माझ्याविषयी असलेलं तिच मत बदललं असणार. हा क्षण आजही मला आठवतो आणि करीनाला देखील.” अमिताभ यांनी २०१९ मध्ये फोटो शेअर करत ही संपूर्ण घटना सांगितली होती.