पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठींब्याच्या यूट्यूब वरील बनावट चित्रफितीवर बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. या चित्रफितीमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच देशाचे भावी पंतप्रधान व्हावेत, अशी मागणी अमिताभ बच्चन करत आहेत.
ट्विटरच्या माध्यमातून आपला राग जाहीर करीत अमिताभ बच्चन यांनी स्वत:ला या चित्रफितीपासून लांब ठेवले आहे.
“बनावट! बनावट!! बनावट!!! भयंकर आणि संतापजनक असे अनधिकृत कृत्य.. वाचा आणि निषेध करा..!!!”
या आशयाचे ‘ट्विट’ अमिताभ बच्चन यांनी केले आहे. हे कृत्य करणारांच्या विरोधामध्ये आपण योग्य ती कारवाई करणार असल्याचे अमिताभ बच्चन पुढे म्हणाले असून, बिग बी यांची तांत्रिक टीम या बनावट चित्रफितीच्या उगमस्थानाचा शोध घेत आहेत.
बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर देखील या बनावट चित्रफितीवर संताप व्यक्त केला आहे.
हा संताप आहे..
मित्र हो… बनावट चित्रफित फिरत आहे..
मी २००७ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी ‘लीड इंडिया’ नावाची मोहीम केली होती. त्यामध्ये मी देशाची स्तुती केली होती!
या ठिकाणी ती चित्रफित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा