बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी अमिताभ चक्क आपल्या कानांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या कानांचं मनोगत व्यक्त करणारी एक कविता पोस्ट केली आहे. त्यांची ही कविता सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
बिग बींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कविता पोस्ट केली आहे. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या कानांचं मनोगत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कान जर खरंच बोलू लागले तर ते काय बोलतील? स्वत:च्या समस्या कशा सांगतील? हे त्यांनी या कवितेद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. “मैं हूँ कान… हम दो हैं… जुड़वां भाई…, लेकिन हमारी किस्मत ही ऐसी है, कि आज तक हमने अपने दूसरे, भाई को देखा तक नहीं” असे या कवितेचे बोल आहेत. बिग बींनी पोस्ट केलेली ही कविता सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.