जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा केल्याचे ऐकून आपल्याला अभिमान वाटल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. गेली १० वर्ष अमिताभ बच्चन हे पोलिओमुक्तीच्या अभियानाशी जोडले गेले होते. त्यामुळे आता पोलिओ भारतातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे हे ऐकल्यावर आपल्याला खूप आनंद झाला आहे, अशी भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली.
हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘युनिसेफ’चे सदिच्छादूत आहेत. त्यामुळे याच माध्यमातून ‘पोलिओ हटाव’ मोहिमेशी ते जोडले गेले होते. ‘दो बूँद जिंदकी के..’ म्हणत अमिताभ यांनी केलेल्या पोलिओमुक्तीसाठी पोलिओ डोस पाजण्याचा संदेश देणाऱ्या जाहिराती लोकप्रिय झाल्या होत्या. भारत पोलिओमुक्त झाल्याबद्दल आनंद झाला आहे.
पण, पोलिओच्या उच्चाटनासाठी खेडोपाडय़ातून जे स्वयंसेवक आणि आरोग्य सेवक अथकपणे राबत होते त्यांचा खरा यानिमित्ताने सत्कार व्हायला हवा, अशी इच्छाही अमिताभ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
देश ‘पोलिओ’मुक्त झाल्याचा अभिमान – अमिताभ बच्चन
जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा केल्याचे ऐकून आपल्याला अभिमान वाटल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.
First published on: 23-01-2014 at 02:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan proud of polio free india