जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त झाल्याची अधिकृत घोषणा केल्याचे ऐकून आपल्याला अभिमान वाटल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. गेली १० वर्ष अमिताभ बच्चन हे पोलिओमुक्तीच्या अभियानाशी जोडले गेले होते. त्यामुळे आता पोलिओ भारतातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे हे ऐकल्यावर आपल्याला खूप आनंद झाला आहे, अशी भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली.
हिंदी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ‘युनिसेफ’चे सदिच्छादूत आहेत. त्यामुळे याच माध्यमातून ‘पोलिओ हटाव’ मोहिमेशी ते जोडले गेले होते. ‘दो बूँद जिंदकी के..’ म्हणत अमिताभ यांनी केलेल्या पोलिओमुक्तीसाठी पोलिओ डोस पाजण्याचा संदेश देणाऱ्या जाहिराती लोकप्रिय झाल्या होत्या. भारत पोलिओमुक्त झाल्याबद्दल आनंद झाला आहे.
पण, पोलिओच्या उच्चाटनासाठी खेडोपाडय़ातून जे स्वयंसेवक आणि आरोग्य सेवक अथकपणे राबत होते त्यांचा खरा यानिमित्ताने सत्कार व्हायला हवा, अशी इच्छाही अमिताभ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा