साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचे करोडो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा जेलर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. आता रजनीकांत यांचा नवीन चित्रपट ‘थलाइवर १७०’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन झळकणार आहेत.

हेही वाचा- Rajkumar Rao : राजकुमार राववर निवडणूक आयोगाने दिली खास जबाबदारी, ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्ती

sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Amitabh Bachchan share school days memories in kaun Banega crorepati season 16
अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन तब्बल ३३ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. रजनीकांत यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करीत याबाबत माहिती दिली आहे. रजनीकांत यांनी ट्विटरवर अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले. “३३ वर्षांनंतर मी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘थलाइवर १७०’मध्ये काम करणार आहे. लायका प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल करणार आहेत. माझं हृदय आनंदानं उड्या मारत आहे.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘थलाइवर १७०’ वास्तविक जीवनातील घटनेपासून प्रेरित आहे. त्यामध्ये रजनीकांत एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी ‘हम’, ‘अंधा कानून’ व ‘अटक’ या चित्रपटांत एकत्र काम केले आहे. रजनीकांत आणि अमिताभ यांच्याशिवाय या चित्रपटात राणा दग्गुबती, फहद फसिल, रितिका सिंग, मंजू वॉरियर व दसरा विजयन मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अरिरुद्ध रविचंद्र आहेत. शाहरुखच्या सुपरहिट जवान या चित्रपसाठीही अरिरुद्ध यांनीच संगीत दिले होते.