बॉलीवूडची एकेकाळची प्रसिद्ध आणि चर्चित जोडी अमिताभ-रेखा हे एकाच विमानातून प्रवास करताना आढळले आहेत. १९८१ साली ‘सिलसिला’ चित्रपटात ही जोडी शेवटची एकत्र दिसली होती. त्यानंतर या दोघांमध्ये संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर गेले अनेक वर्षे अमिताभ-रेखा हे एकत्र दिसले नाहीत.
एका कार्यक्रमाच्या परतीच्या प्रवासादरम्यान, हे दोघेही एकाच विमानातून प्रवास करताना आढळले. अमिताभ यांच्यासोबत विमानातील पायलटने काढलेल्या छायाचित्रात बीगबींच्या मागच्या सीटवर रेखा बसलेल्या दिसत आहेत. तब्बल तीन दशके झाली ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही.

Story img Loader