नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘झुंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे.

‘झुंड’ प्रदर्शित झाल्यापासून अनेकजण बिग बींचे कौतुक करताना दिसत आहेत. बिग बींच्या ट्विटरवर अनेक नेटकऱ्यांनी पोस्ट करत त्यांच्या भूमिकेची स्तुती केली आहे. बिग बींनीही काही निवडक व्यक्तींच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच एका चाहत्याने कमेंट करताना म्हटले की, गेल्या ५३ वर्षांत १९६९ मध्ये अमिताभ यांनी चित्रपटात पदार्पण केल्यापासून त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही. अमिताभ हे सर्व अभिनेत्यांमधील प्रिय अभिनेते आहेत.

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”

यावर अमिताभ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “माझे शरीर मला हे करण्याससाथ देतंय. त्यासोबतच तुमचे प्रेम, आपुलकी यामुळे हे सर्व शक्य आहे.” तर दुसऱ्या एका चाहत्याने ट्विटमध्ये म्हटले की, “८० वर्षांचा एक माणूस उच्च दर्जाचे चित्रपट देत आहेत. जो इतर तरुण कलाकारांपेक्षा फारच चांगला अभिनय करतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ‘झुंड’ हा एक स्वच्छ, कौटुंबिक चित्रपट आहे, ज्याद्वारे एक चांगला संदेश मिळतो.”

यावर अमिताभ यांनी फार बोलके उत्तर दिले आहे. अमिताभ बच्चन म्हणाले, “तुम्ही ‘झुंड’ चित्रपटाचे केलेले कौतुक पाहून फार आनंद झाला. पण कृपया कोणत्याही कलाकाराची तुलना करु नका. सर्व कलाकार हे समान आहेत.”

या चित्रपटात अमिताभ यांच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक केले जात आहे. पण याबाबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “माझ्यापेक्षा ते तरुण कलाकारच या कौतुकास जास्त पात्र आहेत. या चित्रपटाचा खरोखरच प्रशंसनीय भाग म्हणजे या तरुणांचा अभिनय. हे सर्वजण झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यांना त्यांच्या टॅलेंटबद्दल अजिबात कल्पना नव्हती. ते फार नैसर्गिक हावभाव देत होते.”

‘झुंड’ चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, सहा दिवसात कमावले इतके कोटी

दरम्यान ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या निमित्ताने आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader