महानायक अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतरही काम करण्याच्या त्यांचा उत्साह हा अनेकांना प्रेरणा देतो. विविध चित्रपटांचे शूटिंग करत असताना ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनचे तुफान प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिग बी दर आठवड्याला आपल्याला भेटत असतात, त्यांच्या आयुष्यातल्या काही घडामोडी, काही किस्से, काही गुपितं ते सांगत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या बंगल्याचे नाव ‘प्रतीक्षा’ का आहे, याचा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘बाजीगर’ चित्रपटात शाहरुख खानच्या जागी दिसला असता ‘हा’ अभिनेता, पण…

जुहू येथे अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला आहे. पूर्वी अमिताभ बच्चन आई-वडिलांबरोबर त्या बंगल्यात राहत होते. पण त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर अमिताभ ते आता राहत असलेल्या ‘जलसा’ बंगल्यात राहायला आले. आता अमिताभ बच्चन कुटुंबीयांसह ‘जलसा’मध्ये राहतात. मात्र, ‘प्रतीक्षा’ हा बंगला अजूनही त्यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. ते अनेकदा वेळ घालवण्यासाठी अनेकदा ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर जातात.

हेही वाचा : …म्हणून अमिताभ बच्चन यांनी नाकारलं होतं महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निमंत्रण

बिग बी यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये त्यांच्या बंगल्याचे नाव प्रतीक्षा का आहे याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, “लोक मला नेहमी विचारतात की तुम्ही घराचे नाव प्रतीक्षा का ठेवलेस? त्यांना सांगू इच्छितो की हे नाव मी निवडलेले नाही. तर माझ्या वडिलांनी या बंगल्याचे नाव ‘प्रतीक्षा’ ठेवले आहे. मी एकदा माझ्या वडिलांना विचारले की, तुम्ही प्रतीक्षा हे नाव का ठेवले? तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांची एक कविता आहे. त्या कवितेची एक ओळ आहे ज्यात वडिलांनी असे लिहिले आहे की, ‘स्वागत आहे सर्वांचे, पण कोणाचीही प्रतीक्षा नाही,’ म्हणून आमच्या घराचे नाव प्रतीक्षा आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan revealed why there house name is pratiksha rnv