बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सध्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले. सध्या ते केबीसीच्या १४ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहे. मात्र केबीसीच्या मंचावर त्यांच्याबरोबर एक अपघात घडला आहे. त्यांच्या पायाची नस कापली गेली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वत: बिग बी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी केबीसीच्या पुढील भागाचे शुटींग करतेवेळी अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस कापली गेली. त्यावेळी त्यांना खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांना त्यांच्या पायाला टाके घालावे लागेल. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : “माझे नाव कधीही…” अमिताभ बच्चन यांनी स्वत: सांगितला नावामागे दडलेला किस्सा

water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Manmohan singh and sharad pawar
Dr. Manmohan Singh Passes Away : “जागतिक धुरंधर नेता गमावला”, शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध

“रविवारी केबीसीच्या पुढील भागाचे शुटींग करत असताना माझा अपघात झाला. त्यावेळी धातूच्या धारदार तुकड्यामुळे माझ्या डाव्या पायाची नस कापली गेली. नस कापल्यानंतर अनियंत्रित रक्तप्रवाह सुरु होता. मात्र केबीसीची टीम आणि डॉक्टरांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे आता तो आटोक्यात आला आहे. माझ्या पायाला टाके पडले आहे. सध्या डॉक्टरांनी मला काळजी घेण्याचा आणि विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मी लवकरच पुन्हा शूटींगला सुरुवात करेन”, असे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्यांचे अनेक चाहते चितेंत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही चाहते हे त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. ते लवकरात लवकर ठीक व्हावेत, अशी प्रार्थना बिग बींचे चाहते करताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : ये दोस्तीनंतर अमिताभ बच्चन यांचे मैत्रीवर आधारित नवे गाणे प्रदर्शित, व्हिडीओ आला समोर

दरम्यान गेल्या ११ ऑक्टोबरला अमिताभ यांनी ८० वा वाढदिवस साजरा केला. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त एक खास शो चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन देखील दिसले होते. यावेळी अमिताभ खूप भावनिक झालेले पाहायला मिळाले.

Story img Loader