बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’चे सुत्रसंचालन करत आहेत. यंदाचे हे ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ वे पर्व सुरु आहे. या संपूर्ण आठवड्यात ‘केबीसी १३’ ची टीम करोना साथीच्या काळात डॉक्टर आणि नर्सेस यांनी केलेल्या कार्यासाठी श्रद्धांजली देत आहे. शो दरम्यान, अमिताभ यांनी खुलासा केला की त्यांची मुलगी श्वेताला इंजेक्शनची भीती वाटते.
मंगळवारी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये राजस्थानच्या सविता भाटी या हॉटीसीटवर होत्या. सविता या नर्स आहेत. अमिताभ यांच्याशी बोलत असताना सविता यांनी सांगितले की त्या इंजेक्शनला घाबरतात. हे ऐकून अमिताभ हसले आणि त्यांनी त्यांची लेक श्वेता बच्चन नंदाची एक मजेशीर गोष्ट सांगितली. “माझी मुलगी सुद्धा इंजेक्शनला खूप घाबरते. तिने इंजेक्शनचे नाव दुरून जरी ऐकले तर ती इतकी घाबरते की ती दुसऱ्या खोलीकडे धावते,” असे अमिताभ म्हणाले.
आणखी वाचा : पतीचे घर सोडून समांथा मुंबईत राहणार?
आणखी वाचा : छोट्या पडद्यावरील ‘हे’ सुपरस्टार एकेकाळी होते बेरोजगार…
अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनचे लग्न १९९७ मध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूरच्या आत्याचा मुलगा निखिल नंदाशी झाले. श्वेता आणि निखिल यांना २ मुलं आहे. त्यांच्या मुलीचे नाव नव्या आणि अगस्त्य आहे. अमिताभ नेहमीच नव्या आणि अगस्त्यचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.