बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अमिताभ बच्चन, सलमान खान आणि इरफान खान यांच्यात युद्ध सुरु झाले आहे. आता तुम्ही म्हणाल हे तिनही अभिनेते त्यांच्या कामात चोखंदळ आहेत. आता यांच्यात कसली चुरस लागणार. तर येत्या ‘बिग स्टर एन्टरटेंमेन्ट’ या पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी यांच्यात रेस लागली आहे.
अमिताभ, सलमान आणि इरफान हे तिघेही सदर पुरस्काराकरिता नामांकित झाले आहेत. अमिताभ यांना ‘पिकू’ चित्रपटात साकारलेल्या वडिलांच्या भूमिकेकरिता नामांकित करण्यात आले आहे. तर बॉलीवूडचा प्रेम म्हणजेच सलमानला ‘प्रेम रतन धन पायो’साठी नामांकन मिळालेय. इरफान हादेखील ‘पिकू’साठी नामांकित करण्यात आला आहे.
दुसरीकडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी दीपिका पदुकोण (पिकू), कंगना रणौत (तनू वेड्स मनू रिटर्न्स), प्रियंका चोप्रा (दिल धडकने दो) आणि सोनम कपूर (प्रेम रतन धन पायो) यांच्यात चुरस आहे.

Story img Loader