शेहनशहा अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अन्य बॉलीवूड कलाकार उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी जमा करणार आहेत. स्वातंत्र्य दिनी ‘स्टार इंडिया’ या संगीत कार्यक्रमात संगीतकार शंकर-एहसान-लॉय आणि लेखक प्रसून जोशी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सादरीकरण करणार आहेत.
अमिताभ म्हणाले की, आमच्यावर प्रेम करणा-या आणि आम्हाला प्रसिद्धी प्राप्त करून देणा-यांना मदत करण्याची संधी या पुढाकारामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला मिळत आहे. तसेच, या अनपेक्षित आपत्तीमध्ये वेदनाग्रस्त झालेल्या साथीदारांसाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. अमिताभ हे प्रसून लिखित ‘साथ है हम उत्तराखंड’ या गाण्यास आवाज देणार असून शंकर-एहसान-लॉय त्यास संगीतबद्ध करणार आहेत. स्टार इंडिया, विजक्रॉफ्ट, फिल्म अॅण्ड टिव्ही निर्माते गिल्ड आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकांनी मिळून संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
अमिताभ यांच्याव्यतिरीक्त सलमान खान, माधुरी दीक्षित, लता मंगेशकर, ए.आर.रेहमान, अजय देवगन, काजोल, अनिल कपूर, बूमन इराणी, मुकेश भट्ट, आयुष्यमान खुराना आणि इतर कलाकार या निधी कार्यक्रमाच्या पुढाकाराचे समर्थन करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2013 रोजी प्रकाशित
बॉलीवूड कलाकारांचा उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी निधी
शेहनशहा अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अन्य बॉलीवूड कलाकार उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी जमा करणार आहेत.
First published on: 09-08-2013 at 02:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan salman khan to raise funds for uttarakhand flood victims