बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर आज (१ एप्रिल) सर्वांना एप्रिल फूल करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांनी आपण ट्विटरला बाय बाय करणार असल्याचे ट्विट केले आहे. अनुपम खेर हे ट्विटरवर नेहमीच अॅक्टिव असतात. आपल्या चाहत्यांशी आणि सहकलाकारांशी संवाध साधण्यासाठी ते या सोशल साइटचा वापर करतात. तसेच, त्यांनी ट्विटरद्वारे पत्नी किरण खेर यांचा प्रचारही करण्यास सुरुवात केली आहे. किरण खेर या भाजपसाठी चंदीगढ येथील मतदारसंघातून उभ्या राहिल्या आहेत.
अनुपम यांनी आपण ट्विटरवर “फायनली माय बाय बाय टू ट्विटर”, असे ट्विट केले खरे, पण त्यांचे जवळचे मित्र अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एप्रिल फूलचा खुलासा केला. अमिताभ यांनी ट्विट केले की, “नो उल्लू बनाइंग अनुपम!”
यापूर्वी अजय देवगण, शाहरुख खान, अनुराग कश्यप यांनी नकारात्मक प्रसिद्धीमुळे ट्विटवरून काढता पाय घेतला होता. मात्र, शाहरुख आणि अजय देवगण हे पुन्हा ट्विटवर आले आहेत. तर, अनुराग कश्यपने ट्विटवरूनपासून लांब राहणेच पसंत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा