बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी तेव्हा पान मसाला कंपनीसोबतचा करार संपवला आणि याची माहिती त्यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे माहिती दिली. करार संपल्यानंतर अमिताभ यांनी आता पान मसाला ब्रँडवर चक्क कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर त्यांनी ब्रँडला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ यांनी कमला पसंद या पान मसाला ब्रँडची जाहिरात बराच काळ केली आहे. त्यावर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पान मसाला ब्रँडसोबतचा त्यांचा करार संपवण्याचा निर्णय घेतला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बींनी आता कंपनीला नोटीस पाठवली आहे, कारण करार संपला असूनही, पान मसालाची ती जाहिरात ज्यात अमिताभ आहेत ती टीव्हीवर जाहिराती दरम्यान दाखवली जातं आहे.

आणखी वाचा : राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा ‘या’ गोष्टीवर करतोय १०० कोटी खर्च?

आणखी वाचा : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिकेने केली चाहत्याच्या चेहऱ्यावर ‘लघुशंका’

काही दिवसांपूर्वी अमिताभ आणि रणवीर सिंग यांनी एकत्र कमला पसंद या पान मसालाच्या जाहिरातीत काम केले होते. शाहरुख खान, अजय देवगन सारखी पान मसालाची जाहिरात केल्यामुळे अमिताभ यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी कमला पसंद या पान मसालाच्या ब्रँडसोबत करार संपवला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan sends legal notice to pan masala brand as ads continue to air despite contract termination dcp