‘सोशल नेटवर्किंग’ हा हल्लीच्या तरुणाईचा परवलीचा शब्द झाला असून माहिती-तंत्रज्ञानाच्या महाजालात तरुण पिढी ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘व्हॉट्सअॅप’ यासारख्या माध्यमात मोठय़ा प्रमाणात रमलेली पाहायला मिळत आहे. बॉलीवूडमधील काही मंडळीही ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’वर असून या सगळ्यात बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी इथेही आपले ‘शहेनशहा’पण सिद्ध केले आहे. ‘ट्विटर’वर अमिताभ यांना १ कोटी ३० लाखांहून अधिक फॉलोअर मिळाले आहेत.
तरुण अभिनेते किंवा अभिनेत्री यांनाही लाजवेल असा उत्साह या वयातही अमिताभ यांच्यात पाहायला मिळत आहे. ‘फेसबुक’, ट्विटर’ आणि ‘ब्लॉग’च्या माध्यमातून अमिताभ सातत्याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांबरोबरच सामाजिक आणि ताज्या घडामोडींवरही त्यांचे नियमित भाष्य असते. आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी ‘सोशल नेटवर्किंग मीडिया’ हे प्रभावी माध्यम असल्याचे अमिताभ यांचे म्हणणे आहे.
२०१० पासून अमिताभ ‘ट्विटर’वर सक्रिय आहेत. ‘ट्विटर’वरूनच अमिताभ यांनी ही माहिती आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचविली आहे. अमिताभ पाठोपाठ बॉलीवूडमधील शाहरुख खान आणि अभिषेक बच्चन हेही ‘ट्विटर’वर लोकप्रिय आहेत. बॉलीवूडमधील अन्य तरुण अभिनेते आणि अभिनेत्रीही ‘ट्विटर’वर आहेत, पण अमिताभइतकी लोकप्रियता अन्य कोणाला मिळालेली नाही.
‘ट्विटर’वरही अमिताभच शहेनशहा
‘सोशल नेटवर्किंग’ हा हल्लीच्या तरुणाईचा परवलीचा शब्द झाला असून माहिती-तंत्रज्ञानाच्या महाजालात तरुण पिढी ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘व्हॉट्सअॅप’ यासारख्या माध्यमात मोठय़ा प्रमाणात रमलेली पाहायला मिळत आहे.
First published on: 08-02-2015 at 03:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan shahenshah of twitter