अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेल्या बहुचर्चित ‘शमिताभ’ या आगामी चित्रपटातून तीन दृष्यांना कात्री लावण्यात आल्याचे समजते. शिवराळ भाषेमुळे ही दृष्ये कापण्यात आल्याचे वृत्त आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटकर्त्यांना सदर दृष्ये काढून टाकण्याचा आदेश दिला होता, त्याचप्रमाणे चित्रपटातील काही दृष्यांमधील वादग्रस्त शब्द काढून त्या जागी अन्य संवादांचा वापर करण्यास सांगितले होते. अश्लील हावभाव असलेली अभिनेता धनुषची चित्रपटातील काही दृष्येदेखील कापण्यात आली आहेत. ६ फेब्रुवारी राजी चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धनुषशिवाय अक्षरा हसनचीदेखील प्रमुख भूमिका आहे.

Story img Loader