बिग बी अमिताभ बच्चन अभिनयासोबतच सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. कधी जुने फोटो, कधी सणावाराच्या शुभेच्छा तर कधी कविता शेअर करत ते चाहत्यांशी संवाद साधतात. बिग बींच्या या पोस्ट चाहत्यांसाठी चर्चेच्या विषय असतात. नुकतेच बिग बींनी काही फोटो आणि एक कविता सोशल मीडियावर शेअर केलीय. यात त्यांनी स्वत:च्याच लूकवर चारोळी लिहित विनोद केलाय.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील दोन फोटो ट्वीटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बींनी पांढऱ्या रंगाचं हुडी त्यावर निळा स्कार्फ आणि रंगीत हेरम पॅन्ट परिधान केल्याचं दिसतंय. बिग बींचा हा हटके लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. तर बिग बींनी स्वत:च लूकवर हटके कविता केलीय. “पहन्ने, को दिया पजामा, लगा साड़ी को फाड़ा ;आगे छोटी जेब दे दी, औ’ पीछे लगा है नाड़ा !!” या त्यांच्या हटके कवितेला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय.

Manikrao Kokate On DCM Ajit Pawar
Manikrao Kokate : “अजित पवारांना जे कळतं ते कोणालाही…”, माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रि‍पदाबाबत मोठं भाष्य; म्हणाले, “मला अपेक्षा…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Joe Biden Farewell Speech
Joe Biden Farewell Speech : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बायडेन यांचा निरोपाच्या भाषणातून धोक्याचा इशारा, देशातील अतिश्रीमंतांवर केली टीका
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”

बिग बींचा हा लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. अनेकांनी तर त्यांना ‘नवे रणवीर सिंग’ म्हंटलं आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, “अरे सर हा रणवीर सिंगचा आजार कुठून झाला.” तर दुसरा युजर म्हणाला, “रणवीर भावा जरा सांभाळून रहा फॅशनमध्ये आता बीग बी देखील टक्कर देत आहेत.”

बिग बींच्या या फोटोवर अनेकांनी त्यांना रणवीरपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचं दिसतंय. “रणवीरच्या संगतीत राहून तुम्ही बिघडत आहात” असं काही युजर म्हणाले आहेत.

दरम्यान, बिग बी लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दमदार भूमिकेत झळकणार आहात. हा सिनेमा ९ सप्टेबरला रिलीज होणार आहे. तसचं ते ‘गुडबाय’, ‘उचाई’ या सिनेमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Story img Loader