बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. अमिताभ सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. दिवाळी निमित्ताने अमिताभ यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, यावेळी चर्चा ही त्या फोटोमध्ये असलेल्या पेंटिंगची आहे. या पेंटिंगची किंमत ही कोटींमध्ये आहे.
अमिताभ यांनी हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत संपूर्ण बच्चन कुटुंब दिसत आहे. त्यांचा हा फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. हा फोटो शेअर करत कुटुंब एकत्र सण साजरा करतं आणि एकत्र प्रार्थना करतं. या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, अशा आशयाचे कॅप्शन अमिताभ यांनी दिले आहे. मात्र, काही नेटकऱ्यांचे लक्ष हे बच्चन कुटुंबाच्या पाठी असलेल्या पेंटिंगने वेधले आहे.
ही बैलाची पेंटिंग पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी वेलकम या चित्रपटातील मजनू भाईने ही पेंटिंग काढली ना असं म्हटलं आहे. दरम्यान या व्हायरल झालेल्या पेंटिंगची किंमत ही ४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही पेंटिंग मनजित बावा यांनी काढली आहे. मनजित हे पंजाबमधले होते.
मनजित यांना अशा पेंटिंग काढण्याची प्रेरणा ही पौराणिक कथा आणि सुफी फिलॉसॉफीमधून मिळाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पेंटिंगमध्ये काली, शिवा या देवतांच्या प्रतिमांचे समावेश त्यांच्या पेंटिंगमध्ये असतो. प्राणी, निसर्ग, बासरीच्या आणि मनुष्य आणि प्राण्याच्या सह-अस्तित्वाची कल्पनांचा समावेश त्यांच्या पेंटिंगमध्ये होतो. त्यांच्या पेंटिंग या संपूर्ण जगातील लोकप्रिय ऑक्शन हाऊस म्हणजेच जिथे पेंटिंगचा लिलाव होतो त्या ठिकाणी विकल्या गेल्या आहेत. Sotheby’s या ऑक्शन हाऊसमध्ये या पेंटिंग जवळपास ३ ते ४ कोटी रुपयांमध्ये विकल्या गेल्या आहेत.
आणखी वाचा : “लोकांनी शाहरुखचे चित्रपट का पाहावे?” किंग खानला सल्ला देत महेश मांजरेकर म्हणाले…
दरम्यान, पेंटिंगचा फोटो सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर, काही नेटकऱ्यांनी घरी बैलाचे पेंटिंग ठेवण्यामागचा अर्थ देखील सांगितला आहे. बैल एक वर्चस्व, ताकद, लाभ, यश, समृद्धी आणि आशावादाचे प्रतिक आहे. एवढचं काय तर बैलाचा फोटो हा ऑफिस किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यात ठेवल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते अशी मान्यता आहे.