बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यांचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. तरुण अभिनेत्यांपेक्षाही जास्त ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एका फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण या फोटोला त्यांनी दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक युजर्सनी अमिताभ बच्चन यांच्या या फोटोवर धम्माल कमेंट केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘सांगा पाहू हा कोणाचा हात आहे.’ बिग बींनी सोशल मीडियावर त्यांचा जुना फोटो शेअर केलाय ज्यात कुणाचा तरी हात दिसत आहे. अर्थात अमिताभ यांनी हा हात कुणाचा आहे हे न सांगता चाहत्यांना ते ओळखण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यांच्या या फोटोवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या इन्स्टाग्राम फोटोवर कमेंट करताना काही युजर्सनी, ‘हा हात अभिनेत्री रेखा यांचा आहे.’ असं म्हटलं आहे. तर काहींनी अभिनेत्री स्मिता पाटील यांचं नाव घेतलंय. अशा प्रकारे अनेक युजर्सनी वेगवेगळे अंदाज लावत अमिताभ बच्चन यांच्या या फोटोवर धम्माल कमेंट केल्या आहेत. त्यांच्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं तर ते लवकर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय ते अजय देवगणच्या आगामी चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.