बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. अमिताभ यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ, अभिषेक बच्चन आणि मिथून चक्रवर्ती दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘विजय दिनानाथ चौहान…बॉब बिस्वास…आणि डिस्को डान्सर’, असे कॅप्शन दिले आहे. अमिताभ यांनी शेअर केलेला हा फोटो फार जुना आहे.

आणखी वाचा : ‘काय विचित्र प्रकार आहे…’, व्हिडीओत पॅन्टचं बटन बंद केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल

आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…

त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याच्याशी त्यांच्या फॉलोवर्सची तुलना केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan shares a throwback photo with abhishek bachchan and mithun chakraborty dcp