बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करत आहेत. या शोच्या शूटिंग दरम्यान बिग बींना दुखापत झाली आहे. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या दुखापतीची माहिती दिली आहे. दुखापत झाली असली तरी बिग बींनी शूटिंग मात्र कायम सुरु ठेवलंय. बिग बींच्या पायाचं बोट फ्रॅक्चर झालं आहे. यामुळे त्यांना वेदना सहन करत शूटिंग करावं लागत आहे.
ब्लॉगमध्ये बिग बींनी सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. ही दुखापत ठिक होण्यासाठी आणखी चार ते पाच आठवडे लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बिग बींनी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो केबीसीच्या नवरात्री स्पेशल एपिसोडचे आहेत. त्यामुळे त्यांनी पारंपरिक कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र पायाला दुखापत झाल्याने बिग बींना कोणतेही बूट घालणं शक्य नसल्याने त्यांनी मोज्यांसारखे दिसणारी बूटं घातली आहेत. पायाला दुखापत झाली असली तरी ते शूटिंग एन्जॉय करत आहेत.
KBC 13: जेव्हा बिग बींना विनातिकीट प्रवास करताना टीसीने पकडलं होतं; शेअर केला धमाल किस्सा
बिग बी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणाले, “पायाचं तुटलेलं बोट, फ्रॅक्चर झालंय आणि खूप वेदना होत आहेत. जागा कमी असल्याने या ठिकाणी प्लास्टर होत नाही. त्यामुळे बोली भाषेत सांगायचं झालं तर मोठी टेप लावण्यात आलीय.” तर ही टेप लपवण्यासाठी आणि बोटाचं संरक्षण करण्यासाठी कॅमोफ्लाज बूट घातल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हे बूट मोज्यांसारखेच असतात.
‘दया कुछ तो गडबड है…”, हटके स्टाइलमुळे स्वरा भास्कर ट्रोल
दरम्यान, बिग बी लवकरच हॉलिवूड सिनेमा ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्ये झळकणार आहेत. तसचं रश्मिका मंदानासोबत ते ‘गुडबाय’ सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील. तर आलिया आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातही ते झळकणार आहेत.