बच्चन कुटुंबियांचा लाडला अर्थात अभिषेक बच्चन आज वाढदिवस साजरा करतोय. त्यामुळे आज बच्चन कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण असणार यात शंका नाही. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या लाडक्या अभिषेकला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी फेसबुकवरुन अभिषेकचे काही फोटो शेअर करुन मुलावर शुभेच्छांचा वर्षाव केला. फेसबुकप्रमाणे ट्विटरच्या माध्यमातून देखील त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. अमिताभ आणि जया बच्चन यांचा अभिषेक छोटा मुलगा आहे. तर श्वेता ही मोठी मुलगी आहे. अमिताभ वेळोवेळी आपल्या लाडक्या लेकीचे कौतुक करत असतात. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आता आपल्या मुलावरील प्रेम दाखवून दिले आहे.
T 2524 – A Chelsea win .. a Pizza from Daughter's favorite .. a wishes at 12 .. and another year for Abhishek gone by ..#HappyBirthdayAB pic.twitter.com/N7sPIV2RUn
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 4, 2017
बॉलिवू़डमधील महानायक म्हणून ओळख असणाऱ्या अमिताभ आणि जया बच्चन यांच्या मुंबईतील घरी ५ फेब्रुवारी १९७६ मध्ये अभिषेकचा जन्म झाला होता. बॉलिवूडचा वारसा लाभलेल्या अभिषेकने ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिषेकला सुरुवातीच्या काळात फारसे यश मिळाले नाही. चित्रपटाव्यतिरिक्त अभिषेकच्या शिक्षणाबद्दल बोलायच तर,जमुनाबाई नर्सरी स्कूल, बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि दिल्लीतील मॉडर्न स्कूल असा अभिषेकचा शैक्षणिक प्रवास झाला. व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी अभिषेकने अमेरिकेला उड्डाण केले. त्यानंतर त्याने अभिनयाच्या ओढीने शिक्षण अर्ध्यावरच सोडून पुन्हा स्वप्न नगरी गाठली. कारकिर्दीच्या सुरुवातीला अपयश पचविल्यानंतर अखेर २००४ मध्ये अभिषेकला यशाचे कवडसे दिसले. ‘धूम’ चित्रपटाने त्याला अखेर एक ओळख स्वत:ची अशी ओळख निर्माण करण्यात यश आले, असे म्हणता येईल.
@SrBachchan @SrBachchan #HappyBirthdayAB
Happy Birthday AB ❤ pic.twitter.com/AmvuH1b4SY
— Manar-Amitabh❤️EF (@anaa4321) February 4, 2017
या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्याला पुरस्कार देखील प्राप्त झाला. सहायक कलाकार म्हणून अभिषेकला ‘धूम’ चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर अभिषेकला निर्मात्याच्या रुपात ‘पा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. ‘पा’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन एका वेगळ्या भूमिकेत दिसले होते.