बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आर बल्की यांच्या आगामी ‘शमिताभ’ चित्रपटातील ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ रेखाचित्र ऑनलाइन प्रसिद्ध केले आहे.
shamitabh-sketch-embed
भरगच्च दाढी असा लूक असलेले ७२ वर्षीय अमिताभ यांचे रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. दीपिका पादुकोणसह शूजीत सरकारच्या ‘पीकू’ चित्रपटातील कामानंतर अमिताभ ‘शमिताभ’च्या चित्रीकरणाकरिता गुजरातला रवाना झाले आहेत. ‘शमिताभ’च्या या रेखाचित्रासोबत त्यांनी एक कवितादेखील शेअर केली आहे. या चित्रपटात धनूष आणि कमल हसनची मुलगी अक्षरा यांच्याही भूमिका आहेत. बच्चन यांनी यापूर्वी ‘चिनी कम’ आणि ‘पा’ या चित्रपटांमध्ये बल्कींसोबत काम केले होते.

Story img Loader