बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अमिताभ सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच त्यांनी एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्या फोटो मागची कहाणी देखील सांगितली आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ यांनी निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. “ते काय दिवस होते मित्रांनो..आणि हा गाठ मारलेला शर्ट..त्याची पण एक कहाणी आहे..शूटचा पहिला दिवस..शॉट रेडी..चित्रीकरणाला सुरुवात होणार..तर हा शर्ट खूप लांब निघाला..गुडघ्यांच्या खाली जात होता..दिग्दर्शक दुसऱ्या शर्टाची वाट पाहू शकत नव्हते.. म्हणून त्या शर्टाला गाठ बांधली आणि..”, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

अमिताभ यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्यांच्या या लूकला कॉपी केल्याचे म्हटले आहे. कॉमेडियन सुनील ग्रोव्हर म्हणाला, ‘आम्ही सर्वांनी हा लूक कॉपी केला.’ दरम्यान, अमिताभ सध्या ‘कौण बनेगा करोडपती १३’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Story img Loader