बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन सध्या अहमदाबादमध्ये आहेत. राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येत असलेल्या ‘खुशबू गुजरात की’ या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी ते अहमदाबादमध्ये असल्याचे राज्याच्या वरिष्ठ सरकारी अधिका-याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘खुशबू गुजरात की जाहिराती’च्या तिस-या टप्प्याचे चित्रीकरण करण्यासाठी अमिताभ बच्चन येथे आले आहेत, असे गुजरातचे प्रधान सचिव (पर्यटन) विपुल मित्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

सार्खेज रोझा आणि विंटेज कार म्युझियम येथे शूटींग करण्यात येणार आहे. मात्र, याबाबतची अधिक माहिती देण्यास मित्रा यांनी नकार दिला.