बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ यांचा झुंड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यात अमिताभ यांनी या चित्रपटासाठी मानधनात कपात केली होती. याचा खुलासा चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी एका मुलाखतीत केला आहे.
अमिताभ यांना चित्रपटाची पटकथा प्रचंड आवडली. त्यांना चित्रपटावर पूर्ण विश्वास होता, तर चित्रपटासमोर येणाऱ्या अडचणी पाहता बिग बींनी त्यांच्या मानधनात कपात करण्याची ऑफर दिली. एवढचं काय तर बिग बींच्या टीमने अमिताभ यांचं हे बोलण ऐकताच मानधन कमी घेण्याचं ठरवलं.
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
संदीप सिंग यांनी नुकतीच ‘मिड-डे’ला मुलाखत दिली. ‘बच्चन सरांना ही स्क्रिप्ट खूप आवडली. चित्रपटाचा बजेट कमी असताना त्यांना कसं कास्ट करणार असा विचार आम्ही करत होतो. त्यावेळी अमिताभ यांनी त्यांच मानधन कमी केलं आणि आम्हाला सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. माझ्यावर खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर खर्च करा. यानंतर अमिताभ यांच्या टीमने मानधन कमी केलं”, असे ते म्हणाले.
आणखी वाचा : “खरंच प्रार्थना पूर्ण होतायेत असं वाटतंय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
या चित्रपटाच्या चित्रीकरणात अनेक अडथळे आल्याचे देखील त्यांनी सांगितले. २०१८मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटासाठी पुण्यात सेट उभा केला होता, पण पैशांच्या कमतरतेमुळे तो काढावा लागला होता. T-Series आमच्या मदतीला येण्याआधी हा प्रोजेक्ट वर्षभरापासून रखडला होता. “आम्ही चित्रपटाचे शूटिंग नागपुरात केले, भूषण कुमार यांचे आभार, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला,” असे संदीप म्हणाले.
आणखी वाचा : “Arrange Marriage म्हणजे मटका, मी जर लग्न केल तर…”; प्राजक्ता माळीचे वक्तव्य चर्चेत
दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.