बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री श्रीदेवी त्यांचा १९९२ सालचा गाजलेला चित्रपट ‘खुदा गवा’च्या सिक्वलसाठी पुन्हा एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
निर्माता मनोज देसाईने दिलेल्या माहितीनुसार, खुदा गवाच्या सिक्वलसाठीची कथा लिहीली जात आहे. या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल होणे गरजेचे आहे असे वाटते त्यामुळे यावर काम करण्यास आम्ही सुरूवात केली आहे. त्याबद्दल प्राथमिक कल्पनाही आम्ही अमिताभ बच्चन यांना दिली आहे. त्यांचीही याबाबतीत सकारात्कम भूमिका आहे. कथा लिहून झाली की पुन्हा एकदा अमिताभ यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. असेही त्यांनी सांगितले.
सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. त्यामुळे नेमकी माहिती सध्यातरी देऊ शकत नसल्याचेही देसाई म्हणाले. तसेच “एकदा अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाला होकार दर्शविला की आम्ही अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी याबाबतीत बोलणार आहोत. तसेच या चित्रपटात बॉलीवूडच्या सध्याच्या तरुण चेहऱयांचाही समावेश करण्याचा मानस आहे.” असेही मनोज देसाई म्हणाले
‘खुदा गवा’च्या सिक्वलसाठी अमिताभ, श्रीदेवी पुन्हा एकत्र?
खुदा गवाच्या सिक्वलसाठीची कथा लिहीली जात आहे. या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल होणे गरजेचे आहे असे वाटते त्यामुळे यावर काम करण्यास आम्ही सुरूवात केली आहे.
आणखी वाचा
First published on: 21-10-2013 at 05:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan sridevi might come together for khuda gawah sequel