बॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अक्षय कुमार, प्रिती झिंटा आणि अभिषेक बच्चन इत्यादींनी ईदनिमित्त शांती, प्रेम आणि भरभराटीचा संदेश दिला. या खास दिवशी बॉलिवूड मंडळींनी टि्वटरवरून आपल्या मित्रपरिवाराला, चाहत्यांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. शुभसंदेशाचे त्यांचे टि्वट्स येथे दिले आहेत.
अमिताभ बच्चन – ईद मुबारक… ईदनिमित्त सर्वांना शांती, सदभावना आणि आनंद इच्छितो…
शाहरूख खान – काय छान पावसाळी दिवस आहे… ईद मुबारक. तुम्हाला शांती आणि आनंद मिळो यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना. बस इतनासा ख्वाब है…
प्रिती झिंटा – भारतातील आणि जगभरातील माझ्या मित्रपरिवाराला ईद मुबारक. हा दिवस तुमच्यासाठी शांती आणि प्रेमाने भरलेला असो… खूप बिर्याणी खा 🙂 टिंग !
अक्षय कुमार – सर्वांना ईद मुबारक. तुमच्या आयुष्यात नेहमी प्रेम, शांती आणि भरभराट राहो.
अनुराग बसु – सर्वांना ईदनिमित्त शुभेच्छा !! गाझामधील जनतेसाठी आणि तेथील मुलांसाठी प्रार्थना करुया.
मधुर भांडारकर – तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना ईदनिमित्त उत्कर्ष आणि आनंदाच्या शुभेच्छा
हेमामालिनी – ईद मुबारक आणि सर्वांना सुप्रभात! देशात आपल्या जवळच्या माणसांमध्ये परतून कमालीचा आनंद होत आहे!
माधुरी दीक्षित – सर्वांना ईदनिमित्त शुभेच्छा! तुम्हा सर्वांना यश, आनंद, प्रेम आणि शांती लाभो!
जुही चावला – या ईदीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात आणि घरात आनंद, शांती आणि भरभराटीचे आगमन होवो…!!! पुन्हा एकदा ईद मुबारक.
करण जोहर – सर्वांना ईद मुबारक… प्रेम… शांती आणि मन:शांती… तुमच्या आयुष्यात सुवर्ण पहाट होवो…
अभिषेक बच्चन – सर्वांना ईद मुबारक. आनंद, शांती आणि भरभराट लाभो.
लता मंगेशकर – नमस्कार. तुम्हा सर्वांना ईद मुबारक.
हृतिक रोशन – प्रियजनहो ईद मुबारक. या ईदीच्या दिवशी एकमेकांना प्रेमाचे आलिंगन द्या. प्रत्येक दिवस ईदीसारखा घालवायला शिकूया.
फराह खान – देव सर्वांच्या प्रार्थनांचा स्वीकार करतो… कधी त्याच उत्तर हो म्हणून असतं, तर कधी तो नकार देतो आणि कधी तो म्हणतो तुम्ही नक्कीच गंमत करत आहात!! सर्वांना ईद मुबारक.
अर्जुन रामपाल – सर्वांना ईद मुबारक. तुम्हाला प्रेम, आनंद आणि शांती मिळो ही सदिच्छा
वरुण धवन – ईद मुबारक. प्रेमाचा वर्षाव करा
सतिश कौशिक – माझ्या सर्व मित्रांना ईद मुबारक… तुमच्या आयुष्यात नेहमी प्रेम, शांती आणि आनंद राहो
निम्रत कौर – सर्वांना ईद मुबारक… आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवावा याची आठवण करून देणारा हा सुंदर दिवस. त्यागातून आणि शिस्तीतून सर्वोत्तम साध्य करण्याची शिकवण देणारा हा दिवस.
सिद्धार्थ मल्होत्रा – सर्वांना ईद मुबारक… प्रेम आणि आदर
अलिया भट – ईद मुबारक !!!! 😉
कुणाल कपूर – सर्वांना ईद मुबारक. सर्वांना शांती, भरभराट आणि प्रेम लाभो. माझ्यासाठी स्वादिष्ट बिर्याणी आणि शेवया
संजय गप्ता – ई द मु बा र क. सणासुदीचा, एकात्मतेचा आणि उत्सवाचा दिवस. तुमचा दिवस चांगला जावो.
श्रीदेवी बोनी कपूर – ईद मुबारक. सर्वांना आनंद, शांती, प्रेम आणि भरभराट लाभो ही सदिच्छा.
बिपाशा बसू – ईद मुबारक:-)
सोनाक्षी सिन्हा – ईद मुबारक! दुवा में याद करना 🙂
अरबाझ खान – ईद मुबारक आप सब को