जया बच्चन यांनी भेट दिलेली शाल परिधान करुन लग्नाचा वाढदिवस साजरा कर-या अमिताभ बच्चन यांनी आजही आपण रोमॅंटिक असल्याचे दाखवून दिले आहे. जया परदेशात असल्याने अमिताभ लग्नाचा वाढदिवस त्यांच्याबरोबर साजरा करु शकले नाहीत. त्यामुळे जया यांनी भेट दिलेली शाल परिधान करुन त्यांच्याविषयीच्या प्रेमभावना अमिताभ यांनी व्यक्त केल्या. अमिताभ दरवर्षी न विसरता लग्नाच्या वाढदिवशी जया यांना शुभेच्छा देतात.
अमिताभ आणि जया यांच्या लग्नाला बुधवारी ४२ वर्षे पूर्ण झाली. ‘वझीर’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जया सध्या परदेशात आहेत. त्यांना रात्री १२ वाजता फोन करुन लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.
आज सकाळी कार्यक्रमाला येत असताना व्हीडीयो कॉलिंगच्या माध्यमातून मी त्यांच्याशीच बोलत होतो. जया यांनाही मला शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण मीडिया आपली वाट पाहत असून कार्यक्रमास उशिर होत असल्याचे त्यांना सांगितले. यानंतर लगेचच कार्यक्रमास उपस्थित झालो. आता कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा फोन करुन त्यांच्याशी निवांतपणे गप्पा मारणार असल्याचे अमिताभ यांनी सांगितले.
जया बच्चन यांनी भेट दिलेली शाल परिधान केल्याने  लग्नाच्या वाढदिवसाचा क्षण संस्मरणीय झाल्याची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली. जया यांनी बंगालमध्ये पिकू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ही शाल भेट दिल्याचे अमिताभ यांनी सांगितले. तो दिवस कायमच स्मरणात राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader