वयाच्या ७९ व्या वर्षी बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) तितक्याच मेहनतीने आणि उर्जेने आपल्याला काम करताना दिसतात. अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी अशी कलाविश्वातील प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. तसेच अमिताभ यांच्या खऱ्या आयुष्याबाबत काही गोष्टी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना अधिक रस असतो. लेखिका पुष्पा भारती यांनी तर ‘अमिताभ बच्चन जीवनगाथा’ म्हणून पुस्तक देखील लिहिलं आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून अमिताभ यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा – “त्याच्यासोबत इंटिमेट सीन करताना…” दिशा पटानीने सांगितलं चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नेमकं काय घडलं?

अमिताभ यांच्या बालपणीचा असाच एक किस्सा या पुस्तकाद्वारे सांगण्यात आला आहे. अमिताभ यांनीच लेखिका पुष्पा हे पुस्तक लिहित असताना हा किस्सा सांगितला. तेव्हा अमिताभ इलाहाबाद येथील क्वाइल रोड येथे राहत होते. त्यांच्या घरासमोर एक घर होतं. त्या घरामध्ये म्हातारी राणी राहते असं लोक बोलायचे. त्या घराच्या चारही बाजूने उंच भिंती होत्या. इतकंच नव्हे तर त्या घरात कोणी जातही नव्हतं. म्हाताऱ्या राणीला तेथील स्थायिक लोकांनीही कधी पाहिलं नाही. या घराच्या बाहेर काही सुरक्षारक्षक फेऱ्या मारत असायचे. घराच्या गेटमधून आतमध्ये जाण्याचा अमिताभ यांनी त्यावेळी बराच प्रयत्न केला.

अमिताभ यांनी सांगितलं की, “या घराबाहेर उभ्या असणाऱ्या सुरक्षारक्षकाने आम्हाला सांगितलं होतं की पैसे घेऊन आलात तर आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडू. त्यावेळी मला आईचा ड्रेसिंग टेबल आठवला. या टेबलवर एक छोटासा डबा होता. ज्यामध्ये काही बांगड्या आणि छोट्या-मोठ्या वस्तू होत्या. मला आठवतंय की त्या डब्यामधील आईचे पैसे मी तेव्हा चोरले होते. माझी चोरी पकडली गेली. चोरी पकडल्यामुळे मला मार देखील मिळाला.”

आणखी वाचा – रणवीर सिंगने लिहिली होती कंडोम कंपनीची जाहिरात, म्हणाला, “त्यानंतर घडलेला इतिहास…”

अमिताभ यांना शेवटपर्यंत त्या घरामध्ये काही जायला मिळालं नाही. पण त्यांनी या पुस्तकाच्यानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला. लेखिका पुष्पा भारती यांनी लिहिलेल्या ‘अमिताभ बच्चन जीवनगाथा’ या पुस्तकामध्ये अमिताभ यांचे अनेक किस्से आहेत.

Story img Loader