बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ यांनी स्ट्राइप असलेला कोट-सूट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळाला दिला आहे. “काय ते दिवस होते…अच्छे दिन थे .. चले गए .. ढूँढने से भी न मिलें”, असे कॅप्शन अमिताभ यांनी दिले आहे. अमिताभ यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : लग्नानंतर अंकिताला पती विकीने भेट म्हणून दिलं ५० कोटींच ‘हे’ गिफ्ट
आणखी वाचा : अभिनेत्रीचा ब्रालेस व्हिडीओ पाहून भडकली तिची आई म्हणाली…
अमिताभ यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या कॅप्शनचा संबंध मोदी यांच्याशी लावला आहे. एक नेटकरी म्हणाला, “अच्छे दिन येणार असं मोदी सुद्धा म्हणाले होते, पण नाही आले…आणि तुम्ही बोलत आहात की अच्छे दिन चले गए.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तुम्ही नकळत बिजेपीवर निशाना साधला आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “२०१४ पासून याचा दिवसांचा शोध सुरु आहे.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “सर अच्छे दिन म्हटलं की मला मोदी आठवतात.”