आगामी मेलबर्न चित्रपट महोत्सवात बॉलीवूड शहेनशा अमिताभ बच्चन यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या महोत्सवात बच्चन यांचा आजवरचा प्रवासही दाखवण्यात येणार आहे. बच्चन सध्या भोपाळ येथे प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत.
मेलबर्न चित्रपट महोत्सवामध्ये माझ्या आजवच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात येणार असून माझा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर मी ‘सत्याग्रह’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी भोपाळला परतणार आहे. ते चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटी मी १ मे रोजी होणा-या ‘द ग्रेट गॅस्बे’ चित्रपटाच्या प्रिमीयरसाठी न्यूयॉर्कला रवाना होणार आहे, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.
या सगळ्यातून मला बाहेर पडायला साधारण वर्षभराचा काळ लागेल कि.. का, कुठे आणि मीच का? असंही ते पुढे म्हणाले आहेत.   
मेलबर्न चित्रपट महोत्सवाला २५ जुलै रोजी सुरूवात होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan to be honoured at melbourne film festival