मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘सप्तपदी’ या गुजराथी चित्रपटाचे अमिताभ बच्चन सह-निर्मिता होते. आता अमिताभ बच्चन स्वत: काम करत असलेल्या हिंदी चित्रपटांचेदेखील सह-निर्मिता असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आर. बाल्की दिग्दर्शन करीत असलेल्या आगामी चित्रपटाचे अमिताभ बच्चन सह-निर्माता आहेत, ज्यामध्ये धनुष आणि कमल हसनची मुलगी अक्षरा यांच्यासुद्धा भूमिका आहेत. लवकरच अनुराग कश्यपच्या टीव्ही मालिकेत दिसणारे अमिताभ बच्चन यांनी दूरचित्रवाणीकडे आपला मोर्चा वळविला असून, या मालिकेचे ते सह-निर्माता असणार आहेत. या कामात त्यांची पत्नी जया बच्चनदेखील त्यांना सहाय्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘भूतनाथ रिटर्न्स’ नंतर अमिताभ बच्चन मनोरंजन क्षेत्रातील अनेक योजना राबविणार आहेत ज्यात दूरचित्रवाणी आणि चित्रपटांचा समावेश आहे.
आर बाल्कींच्या आगामी चित्रपटाचे अमिताभ बच्चन सह-निर्माता
मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सप्तपदी' या गुजराथी चित्रपटाचे अमिताभ बच्चन सह-निर्मिता होते.
First published on: 09-04-2014 at 02:39 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan to co produce r balkis next