बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन हे सध्या एका नव्या गाण्यावर काम करत आहेत. आर. बालकृष्णन म्हणजेच आर. बल्की यांच्या ‘शमिताभ’ चित्रपटासाठी अमिताभ गाणे गाणार आहेत.
“आदेश श्रीवास्तवच्या स्टुडिओमध्ये आणखी एक सेशन केले. काल रात्री ‘शमिताभ’ चित्रपटातील गाण्यावर काम केले. चेन्नई मॅजेशियन इलियराजांकडून खूप चांगले संगीत देण्यात आले आहे,” असे बिग बींनी त्यांच्या ब्लॉगवर लिहले आहे. इलियाराजा हे विशेष संगीतकारांपैकी एक आहेत. गेले कित्येक वर्षे ते काम करत असून आजही त्यांच्या कामात तोच ठळकपणा जाणवतो, असे इलियाराजांबाबत बीग बींनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
इलियारा यांनी त्यांच्या कारकिर्दीत ९००पेक्षाही अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. सध्या ते शमिताभसाठी संगीत देत असून यात धनुषची आणि कमल हसनची मुलगी अक्षरा यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader