बॉलिवूड अभिनेता कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. त्यामुळे अनेकदा ते कविता किंवा मतांसोबतच त्यांचे जुने फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटाच्या सेटवरील एक जुना फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे याचं कॅप्शन सध्या चर्चेत आलं आहे. ‘मायकल जॅक्सनची कॉपी करणं ही माझी मोठी चूक होती’, असं ते म्हणाले आहेत.

“जेव्हा मनमोहन देसाई यांना वाटलं, गंगा जमुना सरस्वती या चित्रपटात मी मायकल जॅक्सनची कॉपी करु शकतो. माझी किती मोठी चूक होती ती”, असं कॅप्शन देत बिग बींनी हा जुना फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा- रणबीर-आलिया साखरपुडा करणार?; काका रणधीर कपूर यांनी केला खुलासा

दरम्यान, ‘गंगा जमुना सरस्वती’ या चित्रपटात बिग बींसोबत मिनाक्षी शेषाद्री, जया प्रदा, अमरिश पुरी, मिथुन चक्रवर्ती निरुपा रॉय आणि अरुणा इरानी या दिग्गज कलाकारांनी स्क्रीन शेअर केली होती.

Story img Loader