सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचा रंग सर्वच क्षेत्रात चढला आहे असं म्हणायला हरकत नाही. बॉलिवूड कलाकारसुद्धा प्रचारसभेत पाहायला मिळत आहेत. तर कुणी चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत आहे. मात्र बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र निवडणुकीवर भाष्य करण्याचा वेगळाच मार्ग निवडला आहे. बिग बींनी केलेलं ट्विट वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.
बिग बींनी निवडणूक काळात एका व्यक्तीच्या सुरक्षेवरून चिंतीत झाले. मात्र त्यांची ही चिंता लोकांच्या हास्यासाठी कारणीभूत ठरली आहे. त्यांनी ट्विटरवर एक जोक पोस्ट केला आहे. या विनोदात त्यांनी नेत्यांच्या झेड प्लस सुरक्षेची टर उडवली. बिग बींनी पोस्ट केलेला हा जोक नेटकऱ्यांनाही आवडला आहे. अनेकांनी तो शेअरसुद्धा केला आहे.
T 3135 -” एक बन्दा इलेक्शन मे किस्मत आजमा रहा था, उसे सिर्फ तीन वोट मिले,उसने सरकार से Z+ सुरक्षा की मांग की
जिले के DM ने कहा “आप को सिर्फ 3 वोट मिले है आप को Z+ कैसे दे सकते है
आदमी बोला:-जिस शहर मे इतने लोग मेरे खिलाफ हो तो मुझे सुरक्षा मिलनी ही चाहिए।”
~ Ef AM— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 16, 2019
अमिताभ बच्चन नुकतेच ‘बदला’ या चित्रपटात झळकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. बिग बींसोबत अभिनेत्री तापसी पन्नूने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.