कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन हे नुकतेच राजस्थानी लूकमध्ये पाहायला मिळाले. हे दोघेही येत्या रविवारी राजस्थानला जाणार असून, कल्याण ज्वेलर्सच्या तीन नव्या शाखांचे उदघाटन बच्चन दाम्पत्याकडून करण्यात येणार आहे. जोधपूर, जयपूर आणि उदयपूरमध्ये तीन नव्या शाखा सुरू करण्यात येत आहेत.
कल्याण ज्वेलर्सच्या तीन नव्या शाखांच्या उदघाटनासाठी बच्चन दाम्पत्य राजस्थानला येत असल्याने आपल्याला आनंद झाला आहे. कंपनीच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक घटना आहे. या दोघांनाही आमच्या शाखांमध्ये बघून त्यांचे चाहतेही खूश होतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष टी. एस. कल्याणरामन यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांचा Te3n हा चित्रपट मेमध्ये प्रदर्शित होतो आहे. तर जया बच्चन यांची भूमिका असलेला हेराफेरी ३ ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan wife jaya to visit rajasthan soon