अमिताभ बच्चन यांनी भूमिका केलेल्या चित्रपटांच्या रिमेकने (डॉन आणि अग्नीपथ) बॉक्स ऑफीसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. प्रियांका चोप्रा आणि दक्षिणात्य अभिनेता राम चरण यांचा आगामी ‘जंजीर’ चित्रपट तयार होत असतानाच अमिताभच्या अजून दोन चित्रपटांनी रीमेकच्या यादीमध्ये वर्णी लावली आहे. अमिताभसोबतच रजनीकांत यांनी भूमिका केलेला ‘अंधा कानून’ आणि श्रीदेवी, जयाप्रदा यांचा ‘आखरी रास्ता’ या दोनही चित्रपटांचा आता रिमेक होणार आहे. पेन इंडिया प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक जयंतीलाल गाडा यांनी या चित्रपटांचे अधिकार शुक्रवारी घेतले आहेत. तसेच, ते या चित्रपटांकरिता उत्साहित असून यातील एका चित्रपटाच्या चित्रीकरणास २०१४ मध्ये सुरुवात करण्यात येणार आहे.
आणखी वाचा