दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सतत चर्चेत असतो. कमी बजेटचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. सोमवारपर्यंत ‘द काश्मीर फाइल्स’ १०० कोटींचा गल्ला करेल, असा अंदाज आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ची चर्चाही फक्त सर्वसामान्य जनतेत नाही तर राजकीय वर्तुळातही रंगली होती. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मात्र, या चित्रपटाविषय दोन वेगळी मत असलेली लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता अमिताभ बच्चन यांची एक क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर नेटकऱ्यांनी ही पोस्ट ‘द काश्मीर फाइल्स’वर आहे का? असे प्रश्न देखील विचारले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. “आम्हाला आता माहित झालं, जे तेव्हा आम्हाला कधीच माहित नव्हतं”. तर नेटकऱ्यांनी हे ट्वीट अनुपम खेर यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाशी जोडले आहे. एक नेटकरी म्हणाला, “मालक तुम्ही धन्य आहात , तुम्ही ‘काश्मीर फाइल्स’बद्दल बोलत आहात का?” चर दुसरा नेटकरी म्हणाला, “सर, तुम्ही ‘द काश्मीर फाइल्स’ हॅशटॅग टाकायला विसरलात.” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अमिताभ यांचं ट्वीट हे द काश्मीर फाइल्सशी जोडले आहे.
आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video
दरम्यान, बिग बींचं हे ट्वीट खरचं ‘द काश्मीर फाइल्स’साठी असेल तर याचा अर्थ ते या चित्रपटाच्या समर्थनात आहेत. बरं, ही ओळ अमिताभ यांनी कोणत्या संदर्भात लिहिली आहे, हे त्यांनी स्वत: सांगितलेलं नाही, त्यामुळेच नेटकरी स्वतःच्या पाहिजे तसा अर्थ लावत आहेत.
आणखी वाचा : “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का
आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?
दरम्यान, हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटाचा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधीही गुजरात आणि हरियाणा येथे हा चित्रपट करमुक्त केला आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन सय्यद यांनी याचिका केली आहे. चित्रपटात मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे.