‘कौन बनेगा करोडपती’च्या या सिझनचा शेवट लवकरच होणार आहे. याकरिता शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांसाठी काही विशेष करायचे ठरविले आहे. यापूर्वी केबीसीच्या सेटवर कधीच दिसले नाही, असं काही तरी करायचं आहे, असे अमिताभ यांनी ट्विट केले आहे.
“केबीसीचा शेवटचा एपिसोड पाहायला विसरू नका… यात काहीतरी वेगळं असणार आहे. आईची शपथ !!”, असे अमिताभ यांनी ट्विट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. ते यात नेहमीची सूत्रसंचालकाची भूमिका तर पार पाडणारच आहेत पण, याचसोबत ते आम आदमी, लल्लन भैय्याच्या भूमिकेत दिसतील. धोती-कुर्ता आणि डोक्याला कपडा बांधलेला असा लल्लन भैय्याचा वेश असणार आहे.

Story img Loader